संगमेश्‍वर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर मासनकोंडमध्ये वाहनाच्या धडकेत सांबर जखमी


संगमेश्‍वर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर मौजे मानसकोंड येथे शुक्रवारी सकाळी सुमारे ७.४० वाजता वाहनाच्या धडकेने एक वन्यप्राणी सांबर गंभीर जखमी झाल्याची माहिती मानसकोंड पोलीस पाटील यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार संगमेश्‍वर विभागातील सर्व कर्मचायांसह घटनास्थळी धाव घेण्यात आली. तपासणीदरम्यान सांबर वाहनाच्या धडकेने जखमी झाल्याचे दिसले. तत्काळ बचावकार्य हाती घेवून जखमी सांबराला पुढील उपचारांसाठी देवरूखात नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करून अधिक सक्षम उपचारांसाठी भांबेड (ता. लांजा) येथे हलविण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत. ही कार्यवाही संगमेश्‍वर वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडूरकर, सहयोग कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वन्यप्राण्यांच्या अपघातांच्या घटना आढळल्यास तत्काळ वनविभागाच्या टोलफ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button