बसस्थानकातील कचरा निर्मूलनासाठी पालिकेने ‘प्लॅस्टिक बॅंके’ची स्थापना केली
रत्नागिरी पालिकेने काही नवे आणि वेगळे करून दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. बसस्थानकातील कचरा निर्मूलनासाठी पालिकेने ‘प्लॅस्टिक बॅंके’ची स्थापना केली आहे. नागरिकांनी आपला प्लॅस्टिक कचरा (पाण्याच्या, कोल्ड्रिंकच्या बॉटल्स, रॅपर्स आदी) इतरत्र न फेकता प्लॅस्टिक बॅंकेमध्ये जमा करायचा आहे. जमा प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जात आहे. प्लॅस्टिक बॉटल्समध्ये खडी, वाळू, वस्तू भरून त्याचा वापर झाडांच्या भोवती अळी करण्यासाठी केला जात आहे.
रत्नागिरी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१ अंतर्गत हे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमासाठी पालिकेचे आरोग्य विभागाचे इंजिनिअर भोईर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, सावर, कांबळे, शेख आणि सुतार सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे
www.konkantoday.com