
डेरवण येथे १२ व्या युथ गेम्सचे २७ फेब्रुवारीपासून आयोजन
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज टस्टतर्फे शिवजयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यानच्या कालावधीत बाराव्या डेरवण युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील क्रीडासंकुलात १९ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.
या स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धीबळ, कॅरम व देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगा यासह फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाबरोबरच यावर्षी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या स्केटिंग पाहण्यास मिळणार आहे.
भारतीय खळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणार्या या स्पर्धेत राज्यभरातील सात हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहे. आहेत. यंदाही विजेत्यांना पदके चषक आणि रोख पारितोषिवे देऊन गौरवण्यात येणार आहे १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रुपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणा प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेत ८ वर्षाखालील ते १८ वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. ऑनलाईन नोंदणी www.svjctsportsacademy. com या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.www.konkantoday.com




