मिरकरवाड्यात पडीक झोपडपट्टीला भीषण आग

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा परिसरात असलेल्या एका पडीक झोपडपट्टीला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अचानक लागली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र, नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आग विझवण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरकरवाडा येथील एका पडीक झोपडपट्टीला रात्रीच्या शांततेत अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला याची कल्पना दिली.

घटनेची माहिती मिळताच नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता जास्त असली तरी, कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या कर्मचाऱ्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

या आगीत पडीक झोपडपट्टी जळून खाक झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रात्रीची वेळ असल्याने आणि परिसर पडीक असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, परंतु अग्निशमन दलाच्या वेळेत पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button