
पुण्यात ऑनलाइन कॅब बुक करून रायगडमधील माणगावच्या हद्दीत जाऊन कॅब चालकाचा खून, गाडी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक
पुण्यात ऑनलाइन कॅब बुक केल्यानंतर रायगडमधील माणगावच्या हद्दीत जाऊन कॅब चालकाचा खून केल्याची घटना उघड झाली. खूनानंतर त्याची कार चोरून तिची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना बाणेर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपीला पकडले.त्यानंतर उर्वरित दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. आदित्य गणेश भगत (वय २२, रा. भोसरी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
आदित्य भगत याच्या खून प्रकरणी माणगाव (जि. रायगड) पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अनिकेत महेश वाघमारे (२६) आणि तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे (२४) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
ताम्हिणी घाटात मित्राचा खून करून फरारी झालेला मुख्य आरोपी सोन्या उर्फ प्रज्वल संतोष हंबीर (राहणार खांदवेनगर, वाघोली, ता. हवेली) यास दौंड ते पुणे प्रवासात पुणे रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (१३ जानेवारी) इंद्रायणी इंटरसिटी एक्स्प्रेसमधून अटक केली असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
बाणेर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस कर्मचारी प्रीतम निकाळजे मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर गस्त घालत असताना ननावरे पुलाजवळ संशयास्पद व्यक्ती कार विक्रीसाठी थांबल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून वाघमारेला पकडले. त्याच्या ताब्यातून संबंधित कार जप्त केली. वाघमारेने साथीदारांच्या साथीने खून केल्याची कबुली दिली.




