लोकअदालत 13 डिसेंबर रोजी


रत्नागिरी, दि. 18 ):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या लोकअदालतचा लाभ घ्यावा व मोठया संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी आवाहन केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार सदर लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. लोक अदातलतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुबिंक वाद, चेक बाऊंस, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणा अंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, नगरपरिषद, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे समाविष्ठ आहेत.
पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button