
आरटीओने जप्त केलेल्या गाड्या चिपळूणच्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत
चिपळूण शहरातील शिवाजीनगर एस्.टी बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत आरटीओने गेल्या अनेक वर्षांपासून जप्त करून ठेवण्यात आलेल्या वाहनांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे रचून ठेवलेल्या या गाड्यांनी आता नैसर्गिक ओहळाचा मार्ग देखिल रोखून धरला आहे.
शिवाजीनगर येथील विस्तारीत जागेत इलेक्ट्रिक स्टेशन देखिल सुरू होणार असल्याने या गाड्या कधी मार्गस्थ होणार याच विवचनेमध्ये आगार व्यवस्थापन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अखत्यारित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेळोवेळी वाहन तपासणी आणि अवैध वाहनांवर कारवाई होऊन गाड्या जप्त करण्यात येतात. जप्त करण्यात आलेली ही वाहने चिपळूण आगाराच्या अखत्यारीतील शिवाजीनगर येथील महामंडळाच्या जागेत ठेवली जातात. जप्त करणयात आलेल्या वाहनांची दंडात्मक रक्कम भरल्यानंतर परिवहन अधिकारी अर्थात आरटीओने दिलेल्या पावतीनुसार राज्य परिवहन नियमाप्रमाणे सद्यस्थितीत असलेले प्रतीदिन पन्नास रुपये भूईभाडे स्वीकारून संबंधित मालकास वाहन ताब्यात दिले जाते.www.konkantoday.com




