
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर काल दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही घटना किल्ल्याच्या पायथ्याशी घडली असून, या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.समाजसेवक रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्याची माहिती तात्काळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाला देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांच्याकडे सातत्याने केली जात आहे, मात्र या अत्यावश्यक कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.




