वेळणेश्वर जि.प. गटात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना आमने-सामने

गुहागर तालुक्यात महत्त्वाची लढत ही वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात होणार आहे. या गटात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना आमने-सामने असून ठाकरे सेनेच्या उच्चशिक्षित उमेदवार सिद्धी संतोष रामगडे विरुद्ध माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकूर यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. 

सिद्धी रामगडे यांना विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचा जबरदस्त पाठिंबा असून आमदार जाधव यांनीच सिद्धी रामगडे यांना वेळणेश्वर गटातून नेत्रा ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात लढण्यासाठी उमेदवारी दिली आहे. तर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी दिली आहे. ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना असे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते जिल्हा परिषद वेळणेश्वर गटात आक्रमक प्रचार यंत्रणा राबवत असून आपापला विजय निश्चित करीत आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button