
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे पायवाटेने घरी जाणार्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे पायवाटेने घरी जाणार्या महिलेचे मंगळसूत्र खेचून चोरट्याने पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७वाजण्याच्या सुमारास घडली. शुभदा शशिकांत कामतेकर (७२, रा. कातळवाडी, गोळप) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभदा कामतेकर या गोळप कातळ्याडी येथील रहिवासी आहेत. १८ रोजी कामानिमित्त त्या बाहेर गेल्या होत्या. यानंतर सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पायटवाटने घराकडे चालल्या होत्या. शुभदा या एकट्या घरी जात असल्याने त्यांना चोरट्याने हेरले. यावेळी शुभदा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरट्याने तेथून पोबारा केला. शुभदा यांनी आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरट्याने त्याठिकाणाहून पळ काढला. याप्रकरणी शुभदा यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३०४ (२) नुसार गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com




