भांडण सोडवायला गेलेल्याच्या पाेटात चाकू मारला ,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तिवरे येथील राहणारा अल्पेश पवार हा चालू असलेले भांडण सोडण्यासाठी गेला असता त्याला नागेश पवार व रोहित निकम या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करून त्याच्या पोटात चाकू खुपसला त्यामुळे अल्पेश हा जखमी झाला आहे.तिवरे येथील राहणारे आरोपी नागेश व रोहित हे दोघेजण दारू पिऊन आले व वाडीतील लोकांना शिवीगाळ करू लागले त्यावेळी फिर्यादीचे वडील त्यांना थांबवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना ढकलून दिले त्यामुळे फिर्यादी अल्पेश मध्ये पडला त्याला आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली व त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला चाकू खुपसला त्यामुळे अल्पेश हा जखमी झाला आरोपींविरुद्ध अलोरे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com