दुर्मीळ पिसुरी हरणाला दिले जीवदान

राजापूर : तालुक्यातील अणसुरे गावचे ग्रामस्थ राकेश कणेरी हे आपल्या कामानिमित्त सकाळी 10 च्या दरम्यान मुंबई-गोवा हायवेने जात असताना हातिवले कोंडये दरम्यान यांना पिसोरी हरीण आढळून आले. दुर्मिळ असलेले हे हरीण घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर कणेरी यांनी लगेचच तिथल्या जवळच असलेल्या काही लोकांना बोलावून त्यांच्या हरणाला जंगलात सोडले.
पिसुरी तथा पिसोरे हरीण हे सर्व जातीच्या हरणांमध्ये सर्वात लहान असते. याचे डोके लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात. म्हणून त्याला माउस डियर देखील म्हटले जाते. आशियाई पिसुरी हरीण व आफ्रिकी पिसुरी हरीण या दोन जाती आहेत. यातील आशियाई पिसुरी हरिणाची एक उपजात भारतात आढळते. त्यामुळे दुर्मिळ असणारे हे हरीण संवर्धित करणे गरजेचे आहे. पिसुरी हरीण हे फार भित्रे असते. त्यामुळे ती शक्यतो रात्रीच कळपाने बाहेर पडत असतात. हातिवले महामार्गावर आढळलेले हे हरीण वाट चुकल्याने व कळप चुकल्याने बिथरले होते. त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button