
रत्नागिरी जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ पाच महिने वाढवून मिळाला
देशातील जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या या कठीण प्रसंगाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिने वाढवून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एश्वर्या काळुसे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील ११ लाख ६९ हजार २०७ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेबरोबरच या मोफत पाच किलो धान्याचा लाभ मिळत आहे.
www.konkantoday.com