
शीळ येथे वारकरी सांप्रदाय मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह
आमदार किरण सामंत, निलेश राणे यांची उपस्थिती
राजापूर : शहरानजिकच्या शीळ येथे वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला कुडाळ-मालवणचे (जि. सिंधुदुर्ग) आमदार निलेश राणे यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा शीळ वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार किरण सामंत, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजू कुरूप, शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, दीपक बेंद्रे, ॲड. यशवंत कावतकर, अरविंद लांजेकर, योगेश नकाशे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार किरण सामंत यांचाही वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शीळ येथे राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या पुढाकाराने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी सप्ताहाचे पाचवे वर्ष होते. दिवसभर हरिपाठ, हभप विश्वनाथ उर्फ भाई महाराज गोसावी यांचे प्रवचन, सायंकाळी हभप सोनुबुवा कुर्णेकर पायी दिंडी संस्थेचा (भांबेड) हरिपाठ, तर हर्चे (ता. लांजा) येथील युवा कीर्तनकार हभप डॉ. मनोहर गोरे यांचे कीर्तन झाले.
यावेळी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार निलेश राणे यांनी सायंकाळी या हरिनाम सप्ताहाला भेट दिली व वारकी सांप्रदाय मंडळातर्फे हाती घेतलेल्या अधात्मिक प्रसाराच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शीळ गावचे सरपंच अशोक पेडणेकर, वारकरी सांप्रदाय मंडळाचे विजय बाईत, गोपाळ गोंडाळ, नामदेव नागरेकर, कृष्णा नागरेकर, सुरेश बाईत, रामचंद्र गोंडाळ, प्रकाश बाईत आदींसह वारकरी भक्तगण उपस्थित होते.




