असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. 10 वर्षं काय अंडी उबवली,”, मोदींवर टीका करीत उद्धव ठाकरे यांचा एक तर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना जाहीर इशारा

_एक तर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर इशारा दिला आहे.तसंच हात उगारला त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही, आदेश पाहिजे तर आदेश देतो असंही ते म्हणाले आहेत. सरकार गेल्यावर तिघंही आपापल्या गावी जातील असा टोला यावेळी त्यांनी लगावला. जायचे असेल तर जा, दगाबाजी करू नका. शिवसैनिकांना घेवून ही लढाई जिंकेन. माजी नगरसेवक जातायत, आताच जा असंही त्यांना स्पष्ट सांगितलं. मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते. सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो आहेएक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या हिंमतीवर आव्हान देत आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “लढाईला तोंड फुटत आहे. हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजपा म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. 10 वर्षं काय अंडी उबवली,” अशी टीका उद्धवठाकरेंनी केली आहे. “आयुष्यातील हे सर्वात मोठे आव्हान. यानंतर आव्हान देणारा कुणी उरला नाही. शिवसेनेची तळपती तलवार आहे. त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही. आलात तर तोडून टाकू. हे व्यापारी आपल्यात फूट पाडत आहेत. एवढे खाताय ते जातंय कुठे. खायला काही मर्यादा आहे की नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. धनाढ्य व चो-यामा-या करणारे दुबार मतनोंदणी करत आहेत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का ? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उप-यांच्या हातात जाईल. मराठीला प्रवेश नाही म्हणतात, पहिले कानफाट फोडा .गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. सगळीकडे पाणी तुंबत आहे. हे विकासपुरूष आहेत. आरेचा भूखंड मुंबई बँकेला देतायत. त्यांचा भ्रष्टाचारी तिथे बसलाय ना. फनेल झोनमध्ये सध्या हवेतला टीडीआर काढतायत. अदानी माझा लाडला सुरू आहे. मुंबईच्या अस्तिवाची लढाई आहे. मोदींनी येत्या विधानसभा निवडणुकीत आलेच पाहिजेत. राहिलेली गुर्मीही काढू असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button