महायुती अथवा स्वबळाचा अधिकार पालकमंत्र्यांना नाही -नारायण राणे


पालकमंत्री म्हणजे सर्वमत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात की महायुती म्हणून हे ठरवण्याचा अधिकार कुठल्याही पालकमंत्र्यांना नाही. पक्ष आणि महायुतीचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. त्याप्रमाणेच निवडणुका होतील, असे मत खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले. रत्नागिरीत झालेल्या जनता दरबारानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादात ते बोलत होते.
सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील उमेदवारांची जोरदार तयारी सुरू झाल्याची पहायला मिळते आहे. महायुतीमधील तीनही पक्षातील उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार की महायुती म्हणून निवडणूक लढवणार याबाबत सर्वत्र चर्चांना उधाण येत आहे. या संदर्भात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेना आमदार किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, नेते प्रशांत यादव उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button