विधवा, एकल महिलांचे राज्यव्यापी सर्वेक्षण करावे, चक्रभेदी सोशल फाउंडेशनची मागणी….


विधवा व एकल महिलांचे राज्यव्यापी सर्वेक्षण करावे, विशेष धोरण आखावे आणि त्यांच्यासाठी निधीची तरतूद करावी. तसेच निराधार महिलांसाठी बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार पेन्शन योजना यांसारख्या योजना नियमित मिळाव्यात, अशी मागणी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशन या संस्थेने केली आहे.
ही संस्था विधवा व एकल महिलांसाठी कार्यरत आहे. या संस्थेने समाजात महिलांना मान-सन्मान मिळवणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच समाजातील अनिष्ट प्रथा हटवणे हे उद्दिष्ट ठेऊन सातत्याने उपक्रम राबवले आहेत. संस्थेने सात महिलांना टी स्टॉल, शॉपसाठी आवश्यक साहित्य मोफत दिले आहे. तसेच या महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदत जसे की वह्या, दप्तर, छत्री, रेनकोट इ. दिली जात आहे. – संस्थेच्या प्रयत्नांमुळे महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबन मिळत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button