जंगलात सापडलेले दोन अंगठ्या, कृत्रिम दात कुणाचे हे प्रयोग शाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार


रामपूर-आवटेवाडी परिसरातील जंगलमय भागात सापडलेली छोटी हाडे मानवी आहेत की अन्य कुणाची हे कोल्हापूर येथील प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. सोमवारी सदर हाडे कोल्हापूरला पाठवली जाणार आहेत. मात्र, याच हाडाच्या बाजूला घटनास्थळीच दोन अंगठ्या, चार एकत्र असलेले कृत्रिम दात सापडले असल्याने नरबळीची चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी आंबा बागेत काम करणार्‍या तीन नेपाळी व स्थानिक अशा चार मजुरांची पोलिसांनी चौकशी केली असता महिनाभरापूर्वीच त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याचे स्पष्ट झाले. मात्र भितीपोटी त्यांनी याबाबतची माहिती कोणालाही सांगितली नाही.  दरम्यान पोलिसांनी सर्व बाजूनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button