
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नुपूर दप्तरदारला तिहेरी पदक
रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मान्यताप्राप्त तसेच अहिल्यानगर तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठवी क्यूरोगी व पाचवी पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा १३ते १५ नोव्हेंबर दरम्यान साई सिल्वर लोन, शिर्डी (अहिल्यानगर) येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत नुपूर नीलेश दप्तरदार हिने अप्रतिम कौशल्य दाखवत इ फ्रीस्टाइल पुमसे सुवर्णपदक, किरोगी फाईट मध्ये रोप्य पदक फुमसेमध्ये कास्यपदक पटकावत दमदार खेळ केला.
नुपूरला रत्नागिरी तालुक्याचे तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. नुपूर पुष्पदत्त इंग्लिश मीडियम स्कूल खेडशी रत्नागिरी येथे शिक्षण घेत असून प्रशालेच्या मुख्याध्यापिका ईशा गोताड आणि क्रीडा शिक्षक रामदास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. तिच्या उज्ज्वल यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर, तसेच जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी शुभेच्छा दिल्या.
युवा अकॅडमीचे पदाधिकारी, पालक, प्रशालेचे शिक्षक यांनी नुपूरचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




