आरोपी तेजस दळवी याला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा

बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेनंतर स्थानिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले होते. आंदोलकांनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात आम्ही दोन – तीन महिन्यांपर्वीच अशाच एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिली असे वक्तव्य केले होते.यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाला आणि कुठे फाशी झाली हे जाहीर करावे असा आव्हान दिले होते. राज्यपालांकडेही या संबंधी विचारणा करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.”काही लोक म्हणाले की महिला सुरक्षित नाही. माता, भगिणींची सुरक्षा करणे हे आमची जबादारी आहे. बदलापूरमधील घटना दुर्दैवी आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना निलंबित करण्यात आले. शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा दिल्या शिवाय राहणार नाही. अशीच एक घटना पुण्यातील मावळमध्ये घडली होती. या घटनेतील आरोपी तेजस दळवी याला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे”, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक बदलापूरच्या घटनेचे राजकारण करत आहेत. आंदोलकांकडे ‘लाडकी बहीण योजना नको – सुरक्षा पाहिजे’, असे बॅनर कसे काय आले? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की सुरक्षा पण आम्ही देणार आहोत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. आमच्या माता भगिणींच्या अब्रूशी खेळण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहाणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बलात्काऱ्याला दोन-तीन महिन्यांपूर्वी फाशी देण्यात आल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणाला आणि कुठे फाशी झाली हे जाहीर करावे असे आव्हान दिले होते. तसेच खासदार राऊत यांनी राज्यपालसी. पी. राधाकृष्णन यांना देखील आवाहन केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की एकनाथ शिंदे खोट न बोलणारा भाऊ आहे. कालपासून विरोधक विचारत आहेत, कोणाला फाशी दिली? कुठे फाशी दिली? पुण्यातील मावळमध्ये बदलापूर सारखीच घटना झाली होती. त्या घटनेतील आरोपी तेजस दळवी याला फाशीची शिक्षा झाली. आम्ही ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली. पोलिसांनी त्यांचे काम केले. पुणे सत्र न्यायालयात तो निर्णय झाला. पुणे न्यायलयात जा आणि माहिती घ्या. असे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री कधी खोटं बोलणार नाही. आमचं संवेदनशील सरकार आहे. गेंड्याच्या कातडीचे सरकार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button