
दापोलीत या मोसमातील सर्वात नीच्चांकी तापमान बुधवारी मध्यरात्री ८.५ अंश नोंदवले गेले
यावर्षीच्या थंडीच्या हंगामामध्ये चौथ्यांदा दापोलीचा पारा ८.५ अंशांपर्यंत खाली आला आहे.मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असणार्या दापोलीचा पारा ८.५ अंशावर आला असून या मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची ही नोंद आहे. गेले दोन दिवस दापोलीत दिवसाच्या आणि रात्रीच्या हवामानात खूप जास्त तफावत जाणवत आहे. दुपारी ३० ते ३२ अंशावर गेलेला पारा रात्री मात्र १० अंशाखाली आलेला पहायला मिळतो आहे.या मोसमातील सर्वात नीच्चांकी तापमान बुधवारी मध्यरात्री ८.५ अंश नोंदवले गेले. तर दुपारचे तापमान ३१.९ इतके होते. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका जाणवत असताना रात्री मात्र कडाक्याची थंडी पडली होती. या विषम हवामानाला सामोरे जावे लागणार आहेwww.konkantoday.com