शिवसेना कार्याध्यक्ष  मा.उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरीतील मुस्लिम समाजातील नेत्यांनी घेतली भेट

आज शिवसेना उपनेते म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांनी रत्नागिरीतील मुस्लिम समाजाचे नेत्यांसमवेत शिवसेना कार्याध्यक्ष मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेतली व रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम मोहल्यातील जमिनीवरील प्रॉपर्टी कार्डप्रमाणे ७/१२ च्या नोंद करण्याबाबत तसेच शासकीय जमिनीवरील
मशिदी अधिकृत करण्याबाबत संबंधित विभागास निर्देश व्हावेत अश्या अनेक प्रलंबित मागण्या निवेदनाद्वारे दिले. त्यावेळी उपस्थित खा.अनिल देसाई,उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप,शहरप्रमुख बिपिन बंदरकर, मुस्लिम समाजाचे नेते यासिन मामु कोतवडेकर, शाहजहान पटेल, नगरसेवक मुसा काझी,सुहेल मुकादम,सुहेल साखरकर,सरपंच जमुरात अलजी, लियाकत नेवरेकर, केतन शेट्ये,मुबिन होडेकर,डॉ.वर्कतुंड शेट्ये आदी.या सर्व प्रश्नांवर कार्याध्यक्ष मा.उध्दवजी ठाकरे यांनी सकारत्मक भूमिका घेतली व लवकरच आपण हे प्रश्न मार्गी लावू असे अश्वासन दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button