
सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील साटेली-भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशातून पोलिसांनी अवैध दोन तलवारी केल्या जप्त
सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील साटेली-भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशातून पोलिसांनी अवैध दोन तलवारी जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कारवाईत दोन तलवारींसह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, यापैकी एकजण बिहारहून आलेला मुस्लीम धर्मगुरू असल्याचं सांगण्यात येत आहेजो प्रशिक्षण देत होता.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेऊन या अनधिकृत मदरशावर तात्काळ बंदी घालण्याची आणि यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत मदरशात छापा टाकून हत्यारे जप्त केली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.