
रत्नागिरी ते राजापूर या महत्वाच्या सागरी मार्गावरील पावस येथील गौतमी नदीवरील पुलाच्या कामाला गती
रत्नागिरी ते राजापूर या महत्वाच्या सागरी मार्गावरील पावस येथील गौतमी नदीवरील नदीत पुलाच्या बांधकामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. या पुलामुळे सागरी महामार्गावरील दळणवळण अधिक सुरक्षित व वेगवान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाट्ये ते पूर्णगड या दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने सुमारे पन्नास वर्षापूर्वी गौतमी नदीवर पूल बांधण्यात आला होता. त्या काळात या मार्गावर एसटी तसेच खाजगी वाहतूक सुरू होती. मात्र त्या वेळी भाट्ये व पूर्णगड येथे खाडीवरील पूल नसल्याने या परिसरात जाण्यासाठी लांजा मार्गे वळसा घ्यावा लागत होता. सन १९८५ मध्ये भाट्ये खाडीवर तर १९९८ मध्ये पूर्णगड गावखडी खाडीवर पूल बांधण्यात आल्यानंतर रत्नागिरी ते राजापूर अशी थेट वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हा मार्ग सागरी महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. या घोषणेनंतर काही ठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण तर काही ठिकाणी नवीन पूल बांधण्याची कामे हाती घेण्यात आली.
सध्या हा सागरी महामार्ग चौपदरी करण्याचे काम प्रगतीपथावर असून त्याच पार्श्वभूमीवर पावस येथील गौतमी नदीवर नवीन पुलासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
www.konkantoday.com




