खा. नारायणराव राणे यांचे श्री परशुराम प्रतिमा देऊन स्वागत


चिपळूण दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे आणि सौ. निलम राणे यांनी आज चिपळूण येथील परशुराम देवस्थानाचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान देवस्थान परिसरात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी देवस्थानाचे अध्यक्ष ऍड. जीवन रेळेकर, विश्वस्त प्रशांत पटवर्धन, अभय सहस्त्रबुद्धे, सौ. गौरी रेळेकर, अरविंद भागवत आणि देवस्थानचे व्यवस्थापक शंकर कानडे यांनी श्री परशुरामाची प्रतिमा देऊन खासदार राणे व सौ. निलम राणे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

देवस्थानातील कार्यपद्धती, भक्तांसाठी उपलब्ध सुविधा आणि विकासकामांची माहितीही राणे दांपत्यांनी जाणून घेतली.
कार्यक्रमानंतर खा. राणे यांनी परशुराम देवस्थानाच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून भाविकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button