दापोली शहरातील अनधिकृत खोक्यांसंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार

दापोली नगरपंचायत प्रशासनाकडून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी कायद्यानुसार होत नसून शासकीय तसेच नगरपंचायतीच्या जागेवर काही जणांनी नगरपंचायत प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता कायस्वरूपी खोके बांधले असून नगरपंचायत प्रशासन त्याकडे डोळेझाक करत असल्याची तक्रार.संदेश मोरे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली असून जिल्हाधिकारी यांनी या तक्रारीवर सुनावणी घेण्यात येऊन योग्य ती चौकशी करण्यात येईल असे आश्वासन.मोरे यांना दिले आहे.
दापोली नगरपंचायत प्रशासन, महसूल विभाग यांनी पोलिस बंदोबस्तात 11 डिसेंबर 2019 रोजी शहरात असलेले अनधिकृत खोके काढून टाकण्याची मोहिम सुरू केली होती. या मोहिमेच्या वेळी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी खोकेवाल्यांना तुमचे योग्य ते पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर बहुतांश सर्व खोकेधारकांनी स्वतःच आपले खोके काढून घेतले होते.
त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने सर्व पथविक्रेत्यांचे मोबाइल अपद्वारे सर्वेक्षण करून त्यांची नांदणी करणे गरजेचे असताना नगरपंचायत प्रशासनाने 2014 पूर्वाच्याच खोकीधारकांची तयार असलेली यादी ग्राह्य मानून त्यांचा समावेश पथविक्रेता योजनेमध्ये केला होता. मात्र तीन महिन्यानंतर नगरपंचायतकडून पुनर्वसन होत नसल्याचे पाहून काहींनी कामगार गल्ली, गाडीतळ येथे स्वतःच पक्क्या स्वरूपाचे बांधकाम केले. नगरपंचायतीच्याच जागेवर हे अनधिकृत बांधकाम होत असूनही त्याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष करत अनधिकृत बांधकाम केल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल अशी रिक्षाद्वारे उद्घोषणा केली होती. तसेच फलकही लावले होते.
त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले व हे बांधकामही बंद करण्यात आले होते. मात्र दि. 28 मे पासून हॉटेल छाया गल्ली तसेच मच्छीमार्केट परिसरात पुन्हा शासकीय जागेत गाळे बांधण्याचे काम बेकायदा सुरू झाल्यावर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचेकडे तक्रार करून बांधकाम करणार्यांवर गुन्हा केव्हा दाखल करणार अशी विचारणा केली असता त्यांनी बांधकाम थांबविण्यास सांगतो एवढेच उत्तर दिले मात्र बांधकाम सुरूच होते. या सर्व प्रकारामुळे दापोलीचे मुख्याधिकारीच या अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन देत असल्याने हे अनधिकृत बांधकाम काढून टाकावे तसेच दापोली नगरपंचायत राबवित असलेल्या शहर पथविक्रेता धोरणाची चौकशी करावी अशी लेखी मागनि अड.संदेश मोरे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे.
यावेळी त्यांचेसोबत माजी आमदार श्री.संजय कदम, दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक श्री.खालिद रखांगे, श्री.रविंद्र क्षीरसागर, छावा संघटनेचे श्री.प्रसाद रेळेकर, श्री.ऋषिकेश गुजर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रकरणी सुनावणी घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button