
भाट्ये सुरुबन येथे मोबाईल चोरी प्रकरणातील दोघे निर्दोष
रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये सुरुबन येथे तरुणाचा मोबाइल चोरी केल्याचा आरोप असलेल्या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अमान इमान हुसेन मुल्ला (२४) व अशर्द राशिद खान (२५) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्ह्यातील माहितीनुसार इंझमाम अस्लम काझी (२१) हा ३ फेब्रुवारी २०२५ भाट्ये सुरुबन मैथे फिरण्यास गेला होता.
दुपारच्या सुमारास इंझमाम याच्या बॅगमधील मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार
समोर आला होता. याप्रकरणी इंझमाम याने रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या तपासामध्ये अमान मुल्ला व अर्शद खान यांनी हा मोबाईल चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी दोघांचीही निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने न्यायालयापुढे ऍड. सुहेल शेख यांनी काम पाहिले.www.konkantoday.com




