
रत्नागिरीचा सुपुत्र अथर्व अतुलराज पाटीलला न्यूझीलंडमध्ये उत्कृष्ट वैमानिक पुरस्कार
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील रहिवासी असलेल्या अथर्व अतुलराज पाटील याने सातासमुद्रापार न्यूझीलंडमध्ये रत्नागिरीचा डंका वाजवला आहे. न्यूझीलंड सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा उत्कृष्ट वैमानिक हा पुरस्कार पटकावून अथर्वने जिल्ह्याच्या नावलौकिकात मोठी भर घातली आहे न्यूझीलंडचे हवाई वाहतूक मंत्री जेम्स मिगर यांच्या हस्ते अथर्वला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अथर्वने न्यूझीलंडमध्ये १९ महिन्यांचा वैमानिक प्रशिक्षण न्यूझीलंड अथर्व पाटील याला उत्कृष्ट वैमानिक पुरस्काराने सन्मानित करताना न्यूझीलंडचे हवाई वाहतूक मंत्री जेम्स मिगर, अभ्यासक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला. प्रशिक्षणानंतर झालेल्या वैमानिक चाचाणीत त्याने आपले कौशल्य सिद्ध करत ’उत्कृष्ट वैमानिक म्हणून मोहोर उमटवली.www.konkantoday.com




