अचीविंग वननेस विथ हायर सोल कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी: येथील नित्या प्राणिक हिलिंग सेंटरच्यावतीने नुकतेच अचीविंग वननेस विथ हायर सोल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेला प्रशिक्षक विजय खनके यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला नवीन १० विद्यार्थी होते. खास मुंबईवरुन प्रितम स्वयंसेवक म्हणून आला होता.

अलिकडेच मी सोल वर्कशॉप केले आणि मला खरोखर वाटते की हा कोर्स व्यवसायातील प्रत्येकासाठी आवश्यक आहे – तो शांत, एकाग्र मनाने आव्हाने आणि निर्णय हाताळण्यासाठी स्पष्टता, संतुलन आणि योग्य ऊर्जा आणण्यास मदत करतो. आमचे प्रशिक्षक, प्रसिद्ध उद्योजक आणि प्रेरक वक्ते श्री विजय खनके यांचे संपूर्ण कोर्समध्ये प्रेरणादायी मार्गदर्शन आणि ज्ञान दिले अशी प्रतिक्रिया राजवर्धन रावराणे यांनी दिली. कार्यशाळेचे नियोजन तेजस महागांवकर, निशा महागांवकर यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button