
हर्णेतील नौका पुन्हा समुद्रावर स्वार
वार्याचा वेग आणि पाऊस कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा मच्छीमारी नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. यामुळे पाच दिवस थंडावलेल्या जिल्ह्यातील मासेमारीला पुन्हा वेग आला आहे. यंदा मे महिन्यात अवकाळी पावसामुळे लवकर हंगाम संपवावा लागल्याने मच्छीमारांचे नुकसान मोठे नुकसान झाले होते. मात्र नवीन हंगामात पापलेट व म्हाकुळ मासळीने मच्छीमारांची जाळी भरल्यामुळे यंदाची ’दमाणी’ तेजीत आली. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी समुद्र खवळल्याने आणि हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आल्यामुळे नौका पुन्हा किनार्यावर आल्याने मासेमारी ठप्प झाली होती. मात्र गुरुवारी हवामान अनुकूल दिसल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका पुन्हा समुद्रावर स्वार केल्या आहेत. सध्या दमाणी म्हणजे वाटेकरी असल्यामुळे गणपतीपूर्वी एक ’पाळी’ मिळेल ही आशा मच्छीमारांना आहे. यामुळे नौका मालकांचे आणि व्यापार्यांचे लक्ष या एका ’पालटी’कडे लागले आहे.www.konkantoday.com




