
रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी अनोख्या पद्धतीने पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारली
देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी अनोख्या पद्धतीने पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारून प्रेक्षकांना प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन दिले आहे. विलास रहाटे यांनी आषाढी एकादशी निमित्त पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारताना जुनी पितळेची परात, त्यामध्ये विविध रांगोळीचे रंग आणि देवरुखवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तलिंगी नदीचे पाणी वापरून ही अनोखी व कठीण रांगोळी केवळ १ तासाच्या कालावधीत पूर्ण केली आहे. पाण्याखालील रांगोळी साकारण्यासाठी कलेचा कस लागतो आणि तशी कठीण रांगोळी केवळ एका तासात पूर्णत्वाला नेणे फारच कौशल्याचे काम असते. परंतु कसबी कलाकार श्री. रहाटे यांनी ही कठीण रांगोळी पूर्णत्वाला नेऊन प्रेक्षकांची वाहवा आणि आशीर्वादही मिळवले आहेत.