
कळंबणी रुग्णालयातील शवविच्छेदन करण्यासाठी मोजावे लागतात एक हजार, चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी.
खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका कामगाराने मयताच्या नातेवाईकांकडे शवविच्छेदन करण्यासाठी एक हजार रुपयाची मागणी करत आहेत. ही गंभीर बाब असून याची गंभीर दखल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खरटमोल यांनी घेऊन त्या कामगारांवर कारवाई करावी. अशी मागणी मयताचे नातेवाईक राजू बाळू चव्हाण आणि बाळू इश्वर चव्हाण यांनी वैद्यकीय अधिक्षक, कळबणी बुद्रुक ग्रामीण रुग्णालय खेड यांचेकडे दिलेल्या लेखी तक्रारींमध्ये केली असून वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय कळबणी बुद्रुक, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com