फुटता फुटत नसल्याने कंत्राटदार हैराणमुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणातील कठीण असलेले कातळ फुटता  फुटत नसल्याने कंत्राटदार हैराण झाला आहे


मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामाची लगीनघाई सुरू झाली आहे. मात्र, घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.कातळ फोडण्याचे काम चाेवीस तास ब्रेकरच्या सहाय्याने सुरू आहे. परंतु, अतिशय कठीण असलेले हे कातळ फुटता फुटत नसल्याने तेथे तात्पुरत्या स्थितीत बायपास तयार करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे.
गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे रखडले होते. सध्या घाटात दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. याठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button