शहर नेतृत्वाकडून विश्‍वासात घेतले जात नाही, शिंदे सेनेत नव्याने प्रवेश केलेल्यांची नाराजी.

ज्या विश्वासाने आम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला तो विश्वास शहर नेतृत्वाकडून जपला जात नाही. कोणत्याही विषयात आम्हाला विश्वासात घेतले जात नसून आमच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. यामुळे आम्हाला पक्षाचे ध्येयधोरणच समजत नसून त्यावर आम्ही नाराज आहोत. यात नेत्यांनी लक्ष घालाव अन्यथा असाच अन्याय होणार असेल तर सात नगरसेवकांसह पक्षाची साथ नाईलाजास्तव सोडावी लागेल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यामुळे शिंदे सेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसून येत आहे.ते पुढे म्हणाले, नागरिकांच्या हितासाठी विकासकामे होतील अशा आशेवर राहून मोठ्या विश्वासाने आम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आम्हाला अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. पक्षाचे शहरातील नेतृत्व आम्हाला विश्वासात घेत नसून पक्षाचे होणारे कार्यक्रम सागिलले जात नाहीत.

मंत्र्यांच्या दौर्‍याची माहिती दिली जात नाही. पक्षाचे नेते येणार असले तरी त्याची माहिती समजून दिली जात नाही. त्यामुळे हे काय चालले आहे हेच आम्हाला कळत नाही.तसेच सत्ताधारी पक्षाकडून नगर परिषदेला येणार्‍या निधीची माहिती दिली जात नसून कामे करताना माजी पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जात नाही. शहरात सुमारे ५० कोटीहून अधिक रक्कमेची विकासकामे झाली. ती बोगस आहेत. त्यांची न. पकडे माहिती मागितली तर दिली जात नाही. इतके अधिकारी बिनधास्त का, त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button