मुंबई गाेवा महामार्गावरील भाेस्ते घाटात रसायन वाहतुकीचा टँकर उलटला

मुंबई गाेवा महामार्गावरील भाेस्ते घाटात शनिवारी सायंकाळच्या सुमारास रसायन वाहतुकीचा टँकर संरक्षक भिंतीवर आदळून उलटला. अपघातात टँकर चालक जखमी झाला. अपघातानंतर रुसायन इतरत्र पसरल्याने वाहतूक काही काळ थबकली. घाटात पुन्हा अपघातांचे सत्र सुरू झाल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. टैंकर कर्नाटक येथून महाड

एमआयडीसीतील एका कंपनीत जात हाेता. चालकाचे नियंत्रण सुटून घाटातील संरक्षक भिंतीवर आदळला. टँकरमधील रसायन मार्गावर पसरल्याने वाहनचालकांमध्ये भीत्तीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरील एक मार्गिका ठाकरेने वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. नगरपरिषदेच्या अग्निशमक दलासही पाचारण करण्यात आले. मार्गावर पसरलेल्या रसायनावर माती टाकण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button