मुंबईत ठाकरेंना धक्का, तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती.आता त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्हमध्येच हत्या करण्यात आली होती. मॉरीन नरोन्हा यानं अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घातल्या होत्या.

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या महिला दहिसर विधानसभा प्रमुख होत्या. त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.राजीनाम्यात तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं की, मी तेजस्वी घोसाळकर माझ्या पदाचा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून काम करण्याची संधी मला मिळाली याबद्दल पक्ष प्रमुख आणि तुमचे आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button