अनु.जातीच्या व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत

*रत्नागिरी, दि. 8 : अनु.जातीच्या व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव, यांच्याकडे अटींची पूर्तता करणारे पुरावे / कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

“अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे” या योजनेत 90 टक्के अनुदानावर 9 ते 18अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरीता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्याचप्रमाणे स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.

स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के रक्कम म्हणजे कमाल रु. 3.15 लाख शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. बचत गटाचे राष्टर्टीकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न असावे. पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाने उद्दिष्ट निश्चित नुसार पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्थसहाय्य मंजूर करुन त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button