
पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांचे साहित्य पुरस्कार जाहीर.
आबलोली : पसायदान प्रतिष्ठान गुहागर या संस्थेच्या वतीने साहित्यिकांना उत्कृष्ट कलाकृतीसाठी पसायदान प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. संस्थेच्या वतीने २०२४ मधील उत्कृष्ट कलाकृतीसाठी पसायदान प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. “डॉ.नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार” रामदास खरे (ठाणे) यांच्या “द लाॅस्ट बॅलन्स” या कादंबरीला, “पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार” सुनीता डागा (पुणे) यांच्या “तुझे शहर हजारो मैलावर” या काव्य कृतीला, तर “विंदा करंदीकर ललित वाड्मय पुरस्कार” निशा डांगे (अमरावती) यांच्या “कपाळ गोंदण” या ललित प्रकाराला जाहीर करण्यात आले आहेत.
पसायदान प्रतिष्ठान गुहागर ही संस्था २०१४ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिवर्षी तीन साहित्यिकांना उत्कृष्ट कलाकृतीसाठी सन्मानित करण्यात येते. २०२४ मधील कलाकृतींना यावर्षी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरातून कादंबरी, कविता, ललित या साहित्य वाड्मयीन प्रकारांमध्ये असंख्य कलाकृती प्राप्त झाल्या. त्यामधून तज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या कलाकृतींना पसायदान प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कादंबरी विभागात “डॉ.नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार” रामदास खरे (ठाणे) यांच्या “द लाॅस्ट बॅलन्स” या कादंबरीला प्राप्त झाला आहे. कविता विभागात दिला जाणारा “पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार” सुनीता डागा (पुणे) यांच्या “तुझे शहर हजारो मैलावर” या काव्य कृतीला जाहीर झाला आहे. तसेच ललित विभागासाठी दिला जाणारा “विंदा करंदीकर ललित वाड्मय पुरस्कार” निशा डांगे (अमरावती) यांच्या “कपाळ गोंदण” या ललित प्रकाराला जाहीर झाला आहे. या तीनही या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम ३००० रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना कोल्हापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये हिंदीतील ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक गोपाल (सहर) शर्मा यांच्या हस्ते शाहू स्मारक मंदिर येथे ११ मे रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.