कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशाची चेन चोरट्याने लांबवली.

कोकणकन्या एक्स्प्रेसने दादर ते विलवडे असा रेल्वे प्रवास करणार्‍या प्रवाशाच्या गळ्यातील ९२ हजारांची सोन्याची चेन अज्ञाताने लांबविल्याची घटना १५ एप्रिल रात्री ११.३० ते १६ एप्रिल रोजीं पहाटे ६.३० या कालावधीत दादर रेल्वे स्टेशन ते विलवडे रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. याबाबतची तक्रार रमाकांत गणपत आयरे (५६, मुंबई विलेपार्ले) यांनी दिली. आयरे हे १५ एप्रिल रोजी कोकणकन्या एक्स्प्रेसने दादर ते विलवडे असा प्रवास करत होते. या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील ९२ हजाराची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली. आयरे यांनी सुरुवातीला दादर रेल्वे स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून लांजा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button