पोलादपूर पोलिसांनी तीन बैल चोरणार्‍या चौघांना गजाआड केले.

खेड तालुक्यातील घेरारसाळगड – परिसरातील गुरे रायगड जिल्ह्यातील ओंबळी भागातील जंगलात चरत असताना त्यातील ३ बैलांची चोरी करणार्‍या चौघांच्या पोलादपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किंमतीचे तीन बैलही हस्तगत करण्यात आले. या बाबत शरद तुकाराम गायकर (रा. घेरारसाळगड-गवळवाडी) यांनी पोलादपूर पोलीस ठाणेत तक्रार नोंदवली होती. मासूम अजीम तालघरकर (२४), मुरशद उस्मान कोर्डेकर (६२), मुकेश पांडुरंग सकपाळ (४०, तिघेही रा. शिरवली-महाड), शब्बीर उस्मान जोगिलकर (३८ रा. कापडे बु.-पोलादपूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

शरद गायकर यांच्या मालकीचे तीन बैल २५ ते २६ मार्चदरम्यान ओंबळी येथील जंगलात चरण्यासाठी सोडले होते. या तीनही बैलांची संशयितांनी चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलादपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव व. पोलीस हवालदार सुतार व सहकार्‍यांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले. ७५ हजार रुपये किंमतीचे ३ बैल पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांच्या अटकेने जनावरांची चोरी करणार्‍यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. या चौघांनी आणखी कोणाची जनावरे चोरली होती का, याचाही तपास पोलादपूर पोलिसांकडून केला जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button