मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे ट्रक चरात कोसळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी.

मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे ट्रक चरात कोसळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला हा अपघात आज सकाळी झाला या अपघातामुळेमुंबई-गोवा महामार्गावरील काहीकाळ वाहतूक ठप्प होती. ट्रक चालक आपल्या ताब्यातील ट्रक ( क्रमांक एम एच 09-BC 5941) घेऊन रत्नागिरी ते देवरूख चालला होता.

ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅग भरलेल्या होता. बावनदी येथे ट्रक आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. आणि ट्रक चरांमध्ये पलटी झाला. यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला. तर क्लिनर किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. नरेंद्र महाराज संस्थानच्या अँब्युलन्सने त्या दोघांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button