
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी करणार युकेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व
रत्नागिरी ः जागतिक अभियांत्रिकी डिझाईन या स्पर्धेसाठी रत्नागिरी -देवरूख येथील राजेंद्र माने रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालय निवड झालेला संघ युके येथे स्पर्धेसाठी रवाना. या संघामध्ये १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सन १९९८ पासून कार्यरत असणार्या आय मेक फॉर्म्युला स्टुडंट या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते. निवड होण्यासाठी विशेष चाचण्या घेतल्या जातात. या चाचणीमध्ये यश मिळवत या टीमने भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त केली आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग चार वर्षापासून कारची निर्मिती करत आहेत. या टीमने सलग दोन वेळा बेस्ट डिझाईन रेसकार ऑफ इंडिया किताब पटकावून राष्ट्रीय स्तरावर नाव केले आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष रविंद्र माने तसेच पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com