आता माहीममध्ये तिरंगी लढत अटळ.

माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. कारण या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पक्षाकडून उमेदवार देण्यात आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महेश सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे.तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे निवडणूक लढवणार आहेत. सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेत अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपसह स्वपक्षातील नेत्यांकडूनही दबाव येत आहे. मात्र मी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. अशातच आज सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचे व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत आले असून समाधान यांनी थेट वडिलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि वेळ सांगून टाकली आहे.आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सर्वांनी शाखा क्रमांक १९४ सामना प्रेस प्रभादेवी इथं उपस्थित राहावं,” असं आवाहन समाधान सरवणकर यांनी केलं आहे. समाधान सरवणकर यांच्याकडून वडील सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची घोषणा करण्यात आल्याने आता माहीममध्ये तिरंगी लढत अटळ असल्याचं दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button