आईस्क्रिमच्या गाडी झाडावर आदळून चालकाचा मृत्यू, एकजण जखमी

संगमेश्‍वर ः पिकअप कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक मेघसिंग याचा जागीच मृत्यू झाला असून सहकारी विक्रमसिंह हा गंभीररित्या जखमी झाला आहे.
मुंबई उपनगरातून कांदिवली येथून डिमॅक्स पिकअप कारमधून आईस्क्र्रिमचा माल घेवून चालक मेघसिंग हा आपला साथीदार विक्रमसिंह यांच्या समवेत रत्नागिरीला जात होता. गोळवली येथे मुकुंदकृपा बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जावून पिकअप कार जोराने आदळली. चालक मेघसिंग हा गाडीतच अडकून राहिला होता. स्थानिक नागरिकांनी त्याला मृतावस्थेतच गाडीतून बाहेर काढले. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच सदरचा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button