
आता निवडणुकीनंतर ठाकरे 2 सरकार येणार-संजय राऊत
राज्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नुकताच नवी दिल्ली दौरा केला. दौऱ्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या भेटीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. काँग्रेस निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास तयार नसल्याचे वृत्त त्या दौऱ्यादरम्यान आले. परंतु आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुढील मुख्यमंत्री कोण असणार? हे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्या सरकारकडून काय करण्यात येणार? त्याचीही माहिती दिली. आता निवडणुकीनंतर ठाकरे 2 सरकार येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार असल्याचे संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले आहे. सरकारकडून दिलेले पैसे कोणाच्या खिशातील पैसे नाही. त्यामुळे लोकांनी त्या पैशांचा लाभ घ्यावा. परंतु मतांसाठी निर्माण केलेली ही योजना बंद होणार आहे. काही दिवसांत सरकारच्या या सर्व योजना बंद करण्यात येतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नव्या स्वरुपात या योजना अणणार आहे. ठाकरे 2 सरकार येणार आहे, असे संजय राऊत यानी म्हटले आहे.