
भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाभरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपदत राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामध्ये, आमदार भरत गोगवले यांचे मंत्रीपद थोडक्यात हुकले.मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एँट्री झाल्याने शिवसेनेच्या आमदारांना वेटिंगवरच राहावे लागले. त्यानंतर, तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही, त्यामुळे मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळ देऊन त्यांचे समाधान करण्यात आले आहे. महामंडळासह राज्य मंत्रीपदाचा दर्जा देऊन शिवसेना आमदारांना खुश करण्यात आलंय. त्यामध्ये, भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला.