रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडांगण नागरिकांना मॉर्निंग वॉक साठी की गुरांच्या मॉर्निंग वॉक साठी.

रत्नागिरी शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मोकळ्या मैदानाची मुळात कमतरता आहे नागरिकांना फिरण्यासाठी मुळात मैदानी कमी आहेत रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गेले कित्येक दिवस कामासाठी बंद आहे रत्नागिरी शहरातील खालच्या भागात राहणाऱ्या शहरवासीयांसाठी प्रमोद महाजन संकुल हे क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आले आहे त्या ठिकाणी नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जिम आदीची रचना करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी सकाळी नागरिक मॉर्निंग वॉक साठी व व्यायाम करण्यासाठी येत असतात मात्र बऱ्याच वेळेला या ठिकाणी देखील विविध कार्यक्रमामुळे व विविध स्पर्धांमुळे नागरिकांची गैरसोय होत असतानाच आता या क्रीडांगणाचा चक्क ताबा गुरानी घेतला आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या नागरिकांना या क्रीडांगणात संपूर्ण गुरांचा वावर दिसून आला गुरे आतील हिरवा चारा खाण्यासाठी या मैदानात आली होती मात्र या क्रीडांगणाला गेट असताना देखील ही गुरे आरामात आत मध्ये फिरत होती त्यामुळे नागरिकांना मॉर्निंग करण्याऐवजी त्या ठिकाणी गुरांचाच मॉर्निंग वॉक सुरू होता त्यामुळे नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांच्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button