
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर
* सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुहूर्त सापडत नाहीय. 20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पार पडणार होती. पण, आता ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा सुनावणीसाठी तब्बल महिनाभरानंतरच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. 17 सप्टेंबरला याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे