
माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल-मनोज जरांगे
माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल असे म्हणत निलेश साहेबांनी नितेश साहेबांना समजून सांगावं. मी आणखी राणे साहेबांना उत्तर दिलं नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊ नये ही विनंती आहे असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.मी आणखी राणे साहेबांना उत्तर दिलं नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊ नये ही विनंती असल्याचे सांगत निलेश राणेंच्या पोस्टवर फार बोलण्याचे टाळले. माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल, निलेश साहेबानी नितेश साहेबाना समजून सांगावे असे म्हणत त्यांनी फडणवीसांकडे टीकेचा मोर्चा वळवल्याचे पहायला मिळाले.दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही जरांगे पाटील, एक-दोन तालुक्यांमध्ये स्वतःचे समर्थक असले म्हणजे राज्याचा नेता किंवा समाजाचा नेता होता येत नाही.काही मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे या माणसाबरोबर राहण्यात आता काही अर्थ नाही, आपल्या भविष्याचा विचार करा. किती वेळा हा माणूस आंदोलन स्थगित करणार आणि पुन्हा सुरू करणार आणि पुन्हा तुम्हाला जमिनीवर बसवणार??