
हिंदू संघटनांच्या मोर्चाच्या वेळी रास्ता रोको केल्याप्रकरणी निलेश राणेंसह ४५० जणांविरोधात गुन्हा
गोवंश शीर प्रकरणी हिंदू संघटनांतर्फे काढण्यात आलेला मोर्चा आणि रास्ता रोको प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह एकूण ४५० जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रकांत राऊळ, निलेश राणे, बाळ माने, राकेश नलावडे, नंदकुमार चव्हाण, राज परमार, स्वरूप पाटील, दत्तात्रय जोशी, पराग तोडणकर, अक्षय चाळके, स्वयंम नायर, संतोष पवार, देवांग, समर्थ पाटील, फाळके, कुलकर्णी, आदी ४५० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी मिळून रविवारी दुपारी ११.३० ते २.३५ या कालावधीत मारूती मंदिर शिवसृष्टी, माळनाका ते जेलरोड असा मोर्चा काढत रास्ता रोको केले होते. त्यांनी शासनाने ४ जुलै ते ३० जुलै २०२४ या कालावधीसाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३१ (१) अन्वये जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com